Description
‘अलार्म कॉल’ म्हणजे ढोबळपणे पाहता पशु-पक्ष्यांना मिळालेला सतर्कतेचा किंबहुना मृत्यूचा इशारा. अगदी दरवेळी नाही पण बहुतांश वेळी या इशाऱ्यानंतर एखाद्याचा अंतकाळ हा ठरलेलाच असतो.
प्रत्येक कठीण प्रसंग येण्यापूर्वी हा इशारा प्रत्येकाला मिळतोच, फरक एवढाच आहे कि काहींना तो समजतो तर काहींना नाही. मग तो इशारा…
निसर्गाच्या सगळ्या नियमांचं उल्लंघन केल्यावर येणाऱ्या त्सुनामीच्या स्वरुपात असो वा..
एखाद्या अबलेवर अत्याचार होण्याआधी ती मदतीसाठी किंवा जीव वाचविण्यासाठी फोडलेल्या टाहोच्या स्वरुपात असो किंवा…
एखाद्या हिंस्त्र पशूची केवळ चाहूल लागल्यावर चितळ आणि तत्सम प्राणी यांनी मृत्युच्या भयापोटी काढलेल्या इशारात्मक ध्वनीच्या स्वरुपात असो… सगळे अलार्म कॉलच…
Reviews
There are no reviews yet.