Description
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य शासन पुरस्कार विजेते पुस्तक : सर्वोत्कृष्ट बालकविता संग्रह ( बालकवी पुरस्कार )
‘शब्दांची नवलाई’ हा आगळावेगळा बालकवितासंग्रह घेऊन एकनाथ आव्हाड बालवाचकांच्या भेटीला येत आहेत. आगळावेगळा’ यासाठी की बालकविता म्हटले की— वाचकांना पशुपक्षी, शाळा, अभ्यास, सुट्टी, जादूगार, राक्षस, परी हेच ठरावीक कविता विषय आठवतात. त्याच त्या विषयांवर अनेक कवींनी कविता लिहिल्यामुळे बालकविता बदनाम होते की काय, अशी शंका यायला लागली आहे. आजचा बालवाचक डिजिटल युगात वावरतो आहे. त्याची कल्पनाशक्ती अफाट आहे. आमचे बालसाहित्यिक जर आपल्या बालपणीच्या बालकांना गृहीत धरून जुन्याच विषयांवर चाकोरीबद्ध बालकविता लिहीत असतील, तर ती बालकविता आवर्तात अडकण्याची भीती व्यक्त केली जाते. ही भीती रास्त आहे.
एकनाथ आव्हाड यांनी बालकवितेला पारंपरिक चौकटीतून मुक्त केले आहे, याची साक्ष ‘शब्दांची नवलाई’ हा कवितासंग्रह वाचताना पटते. त्यांनी आजवर बालकवितेत अनेक प्रयोग केले आहेत. ‘शब्दांची नवलाई’ हा त्यांचा संग्रह म्हणजे मराठी बालकवितेतील प्रयोगशीलतेचा आणखी पुढचा टप्पा होय.
Reviews
There are no reviews yet.