Description
क्रिकेट आणि संगीत हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक! सामना, सकाळ, षटकार या माध्यमातून क्रिकेट मधील किस्से, टीका, टिप्पणी आपण लेखक द्वारकानाथ संझगिरी यांच्या लेखनातून अनुभवले आहेत. त्यांचे लेखन कौशल्य जुन्या गोष्टींना पुन्हा एकदा नावीन्याने आपल्यापुढे घेऊन येते. ‘खेलंदाजी’ या पुस्तकातील लेखसंग्रह वाचण्याचा योग मला आला आणि पुनः प्रत्ययाचा आनंद मिळाला. अजित वाडेकर, मोहम्मद सिराज, राहुल द्रविड, केन विल्यमसन, सुनील गावसकर, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन ते सचिन तेंडुलकर पर्यंत भारताच्या मौल्यवान हिन्यांचे परीक्षण या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळते.
विविध विषय मांडताना संझगिरींनी केलेला अभ्यास व त्यातील बारकावे हे विशेष भावतात. मुक्तपणे शब्दांची केलेली उधळण आणि तरीही सरळ, साधी भाषाशैली आपल्याला विषयाशी समरस करून टाकते. पत्रकारितेतील अनेक वर्षाचा गाढा अनुभव आणि अनुभवाने समृद्ध झालेले लिखाण वाचकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. रसिक वाचक या संधीचा मनमुराद लाभ घेतील याची मला खात्री वाटते.
अनेक शुभेच्छा!
मिलिंद दत्तात्रय गुंजाळ
Reviews
There are no reviews yet.